महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेरजवळ आश्वी येथे उघडकीस आली असून एका 24 वर्षीय विवाहित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग करणाऱ्या बावीस वर्षीय युवकाविरुद्ध विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बुधवारी 22 तारखेला रात्री नऊ वाजता तसेच गुरुवारी 23 तारखेला सकाळी दहा वाजता हा प्रकार घडलेला असून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संकेत कैलास यादव ( वय 22 राहणार आश्वी तालुका संगमनेर ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. ‘ मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आपण दोघे पळून जाऊन लग्न करू ‘ असे यादव हा 24 वर्ष विवाहित महिलेला वेळोवेळी म्हणत होता. ‘ तू माझ्याशी फोनवर बोलत जा ‘ असे तो विवाहितेला म्हणाला असता तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
‘ तू परत आश्वीत जर आली तर तुला मारून टाकीन ‘ अशी धमकी देखील त्याने विवाहितेला दिली आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिला शिवीगाळ केली, त्यावरून तिने आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे अधिक तपास करीत असून यादव याला अटक करण्यात आलेली आहे