‘ पटवर्धन ‘ काका अडकले सायबर भामट्यांच्या जाळ्यात , अमेरिकेतील मुलासाठी..

Spread the love

महाराष्ट्रात फसवणुकीचे नवनवीन प्रकार रोज समोर येत असून कुवेत एअरवेजचे सीट बुक करतो त्यासाठी एक ॲप डाऊनलोड करा असे सांगत एका व्यक्तीची सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची कामोठे इथे फसवणूक करण्यात आलेली आहे. कामोठे पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सेवानिवृत्त असलेले रवींद्र लक्ष्मण पटवर्धन यांना आपल्या मुलाला भेटण्यासाठी अमेरिका येथे जायचे असल्याकारणाने त्यांनी कुवेत एअरवेजमध्ये ऑनलाइन सीट बुक करण्यासाठी गुगलवर नंबर शोधला होता मात्र त्यांना चुकीचा नंबर मिळाला आणि अलगदपणे ते सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले.

आरोपी व्यक्तींनी त्यांना आपण कुवेत एअरवेजचा कर्मचारी बोलत आहे असे सांगत तिकीट बुक करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला सांगितले आणि त्यानंतर पटवर्धन काका यांनी ते ॲप डाऊनलोड केले त्यातील माहिती समोरील व्यक्तीला सांगितली आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातील एक लाख 25 हजार रुपये गायब झाले . काही वेळाने परत वीस हजार रुपये गायब झाल्याचा मेसेज आल्यानंतर ती फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दिली.


Spread the love