महाराष्ट्र हादरला..जावयाकडून चार जणांची हत्या , बायकोचाही समावेश

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात समोर आलेले असून तीरजडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आलेली आहे. सदर कुटुंब हे पारधी समाजातील असून जमिनीच्या वादातून जावयाने चार जणांना ठार केलेले आहे त्यात त्याच्या पत्नीचा ही समावेश आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पंडित भोसले , सुनील पंडित भोसले , ज्ञानेश्वर पंडित भोसले , रेखा गोविंदा पवार अशी मयत व्यक्तींची नावे असून रखमा पंडित भोसले या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. गोविंदा पवार असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो मूळचा कळंब येथील रहिवासी आहे. 

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून पोलिसांना याप्रकरणी माहिती मिळाली आणि मध्यरात्री बाराच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 


Spread the love