शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून आईच्या प्रियकरासोबत तीन जणांनी एका सतरा वर्षीय कर्णबधिर मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंढवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हद्दीत समोर आलेला आहे . आरोपीमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि त्याचा मित्र यांचा देखील समावेश आहे
उपलब्ध माहितीनुसार , रणवीर तानाजी मालुसरे रोडवरील एका विशेष मुलांच्या शाळेतील एका शिक्षिकेने यासंदर्भात मुंडवा पोलिसात तक्रार दिली असून सदर प्रकार हा 2019 पासून 2023 पर्यंत सुरू होता.
आरोपी व्यक्तींपैकी एक जण पीडित मुलीच्या कुटुंबातील आहे तर एक जण आईचा प्रियकर आणि एक जण पीडितेचा मित्र आहे . पीडित मुलीची आई दिवसभर धुण्याभांड्याचे काम करत असून पीडीतेच्या वडिलांचे पूर्वीच निधन झालेले आहे. पीडित मुलगी घरी असताना आईचा प्रियकर घरी यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा सोबतच कुणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची देखील धमकी द्यायचा. पीडीतेच्या मित्रांनी देखील तिला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचे म्हटले असून नात्यातील एका मुलाने देखील अत्याचार केलेला आहे असे म्हटलेले आहे.
पीडित मुलगी शाळेत असताना तिच्या मोबाईलमध्ये वर्गातील मैत्रिणींनी तिचे आणि तिच्या काही मित्रांचे फोटो पाहिले त्यानंतर या प्रकाराची शिक्षिकेला माहिती दिली . शिक्षिकेने सखोल तपास केला त्यावेळी हा प्रकार समोर आलेला असून मुंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.