बालेवाडीतील ‘ तो ‘ खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून , दोन जण ताब्यात 

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार पुण्यामध्ये समोर आलेला असून दारू पिणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने मित्रांच्या मदतीने खून केलेला आहे . धारदार लोखंडी हत्याराने वार करून हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीचा बालेवाडीत खून करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राजेश कुमार कांबळे ( वय 25 वर्ष राहणार बाळेवाडी ) असे मयत व्यक्ती याचे नाव असून तो हाऊसकीपिंगची कामे करत असायचा . त्याचा मेव्हणा राहुल शेषराव रिकामे (वय वीस वर्ष राहणार बाळेवाडी ) आणि त्याच्या एका मित्राच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 20 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाळेवाडी येथील गोल्डन टेरेस सोसायटी जवळ ही घटना घडलेली होती. 

पोलीस तपास सुरू असताना या प्रकरणात आणखीन एक ट्विस्ट आलेला असून नात्यातील एका महिलेसोबत राजेश कुमार कांबळे याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून झाल्याची नवीन माहिती समोर आलेली आहे . राजेश याचे आपल्या नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय राहुल आला होता त्यातून त्याने त्याचा मित्र सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाबा सय्यद नूर ( वय वीस वर्ष ) याला हाताशी घेतले आणि राजेश यांचा खून केला . दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिलेली आहे. 


Spread the love