महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली होती. पुण्यातील तळेगाव इथे एका दशांत परदेशी नावाच्या १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला होता . पोलीस तपास सुरु असताना चक्क हा खून हा इंस्टग्रामवरील स्टेटसमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . दशांत नावाच्या १७ वर्षीय मुलाने ‘302 शंभर टक्के’ असं लिहिलेलं आणि त्यासोबत पिस्तूलाचा इमोजी अशा आशयाच स्टेटस ठेऊन ते केवळ सख्खा चुलत भाऊ आणि त्याच्या मित्रालाच दिसेल अशी सेटिंग केली होती’ मात्र त्यामुळे आरोपींचे पित्त खवळले आणि त्यांनी हा खून केला . दशांत याचा चुलतभाऊ आणि त्याचा मित्र प्रकाश लोहार यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशांतने चुलत भाऊ कमलेश आणि मित्र प्रकाशला काही महिन्यांपूर्वी बांबूने मारहाण केली होती मात्र त्याहून पुढे जात दशांतने ‘ 302 शंभर टक्के अन पिस्तूलाची इमोजी ‘ असे इन्स्टावर स्टेटस ठेवलं होतं. दशांत आपल्याला जीवानिशी मारणार असल्याची भीती या दोघांच्या मनात निर्माण झाली. दशांतचा चुलत भाऊ कमलेश हा फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता मात्र दशांत काहीच न बोलता फोन ठेवून देत असल्याने त्यांच्यात गैरसमज वाढत गेले.
दशांत आज नाही तर उद्या आपला खून करेल याची आरोपीना भीती वाटू लागल्याने कमलेश याने त्याचा मित्र प्रकाश याला दशांतला फोन करण्यास सांगितले. प्रकाशने दशांत याला ‘ तू फोटो छान काढतोस माझे फोटो काढायचे आहेत असे म्हणून दंशातला हेवी नॅशनल कंपनी परिसरात बोलावले आणि फोटो काढण्यासाठी पोज घेत असतानाच दशांतवर दोघांनीही हातोडीचे घाव घालत हत्या केली.
दशांत यांचा मृतदेह आढळून येताच परिसरात खळबळ उडाली आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी केवळ संशयाच्या धाग्यावर प्रकाश याच्या खांद्यावर हाथ टाकला आणि तो घाबरला. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं तिथे बऱ्याच वेळ प्रकाशने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र अखेर त्याने दशांतचा चुलत भाऊ कमलेशसह खून केल्याचं सांगितलं. पोलिसांनी कमलेशला देखील अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली आहे.