फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार सध्या पुण्यात समोर आलेला असून घरबसल्या काम करून दिवसाला हजार रुपये कमवा अशा आमिषाला भुलत एका महिलेची गुंतवणुकीच्या नावाखाली 16 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे . पैसे घेऊन कुठलेच काम मिळाले नाही आणि मुद्दलही मिळाली नाही म्हणून फिर्यादी व्यक्ती यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी चाकण परिसरात ही घटना घडलेली असून चाकण पोलिसात एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे. घरबसल्या एक हजार रुपये दिवसाला कमवा अशा आमिषाला ही महिला भुलली होती आणि त्यानंतर फिर्यादी व्यक्ती या महिलेला एक लिंक ओपन करण्यास सांगण्यात आले आणि सुरुवातीला दोन टप्प्यात 260 रुपये देखील देण्यात आले. पैसे मिळत आहेत असे लक्षात आल्यानंतर पुढील कामासाठी त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. फिर्यादी यांना त्यानंतर कुठलेही काम देण्यात आले नाही आणि त्यांची फसवणूक करण्यात आली.