महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार नाशिक इथे समोर आलेला असून प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर अश्लील फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने विवाहित महिलेवर तब्बल तीन वर्ष लैंगिक अत्याचार केलेला आहे. सदर प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला ही विवाहित असून आरोपीचे नाव स्वप्नील शार्दुल ( वय 31 वर्ष राहणार समता नगर टाकळी रोड नाशिक ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे असून आरोपी शार्दुल याने पीडित महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तिच्यासोबत काही फोटो काढले . सदर फोटो महिलेच्या पतीला दाखवेल अशी धमकी देत आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध तिला इतर घेऊन जात तिचे लैंगिक शोषण करत होता.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीने एक जानेवारी 2021 पासून 21 डिसेंबर 2023 पर्यंत कदम मळा , जत्रा हॉटेल समोर आणि आडगाव या परिसरात घेऊन जात वेळोवेळी आपले लैंगिक शोषण केलेले आहे. आरोपीचा त्रास असेही होत असल्या कारणाने महिलेने अखेर आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील शार्दुल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत असल्याची माहिती आहे.