शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनरची तब्बल पाच कोटी एकवीस लाखांची फसवणूक केलेली आहे . भागीदारीत सुरू केलेल्या कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये अफरातफर करून हा प्रकार करण्यात आलेला असून याप्रकरणी शहरातील एका प्रसिद्ध उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर महेश श्रीपाद कोटबागी असे आरोपी व्यक्ती यांचे नाव असून तेबिर्ला कोठबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्सनावाने त्यांचा व्यवसाय आहे . सदर प्रकार 2010 पासून 2018 पर्यंत वारजे येथील जकात नाक्याजवळ त्यांच्या कार्यालयात घडलेला आहे.
सदर प्रकरणी माणिक रामचंद्र बिर्ला ( वय 55 राहणार कर्वेनगर ) यांनी वारजे पोलिसात फिर्याद दिलेली असून फिर्यादी आणि आरोपी यांनी 2010 मध्ये ही कंपनी सोबत सुरू केलेली होती. डेव्हलपमेंट साठी एक जागा घेऊन तिथे अपार्टमेंट देखील बांधण्यात आले आणि फ्लॅटधारकांच्या करण्यात आलेल्या काही एग्रीमेंट बिलवर फिर्यादी यांच्या बनावट सह्या आरोपींनी केल्या असे फिर्यादींचे म्हणणे आहे. फिर्यादी यांच्या वडिलांचे 2010 मध्ये निधन झाले त्यानंतर आरोपींनी अशाच पद्धतीने बनावट सह्या केल्या आणि पाच कोटी एकवीस लाख रुपयांची अफरातफर केली असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे