पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून येरवडा परिसरात एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतलेले आहे .देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या रोडने जाणार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलेले होते.
उपलब्ध माहितीनुसार , बबलू माणिक गायकवाड ( वय 40 वर्ष राहणार लक्ष्मीनगर येरवडा ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून पीएमपी बस थांब्याजवळ एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.