विवाहबाह्य संबंधात मर्यादे पलीकडे जाऊन केलेली तडजोड एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली असून यामध्ये या व्यक्तीने प्राण गमावले आहेत. बहरामपुर येथील हे प्रकरण असून धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीची पत्नी प्रियकरासोबत पळून गेलेली होती त्यानंतर पतीने तिचा शोध घेतला आणि तिला नांदण्यासाठी येण्यास भाग पाडले मात्र पत्नीने त्याच्या समोर जी काही अट ठेवली होती ती कल्पनेपलीकडची होती.
उपलब्ध माहितीनुसार , शिवम गुप्ता असे मयत व्यक्तीचे नाव असून तो बाईक टॅक्सी चालवायचे काम करायचा. त्याची पत्नी प्रियंका ही गरजन यादव नावाच्या प्रियकरासोबत पळून गेली त्यानंतर ती बलिया येथे राहत असल्याची माहिती शिवम यास समजली. शिवमने तिच्याकडे जात पुन्हा नांदायला चल असे सांगितले मात्र पत्नीने जर तू गरजन यास आपल्या सोबत ठेवशील तरच मी नांदेल असे म्हटले. हतबल झालेला पती बायको आणि स्वतःच्या मुलीवरील प्रेमासाठी या गोष्टीला तयार झाला.
काही दिवसानंतर शिवम प्रियंका आणि गरजन हे तिघेही एका भाड्याच्या घरात राहू लागले मात्र शिवम आणि प्रियंका यांच्यात गरजन याच्यावरून भांडणे होऊ लागली. 21 डिसेंबर रोजी शिवम झोपलेला असताना प्रियंकाने आपल्या हाताने त्याचा गळा आवळला आणि तिच्या प्रियकराने शिवम याच्यावर वार केले.
आरोपींनी त्यानंतर शिवम याचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला आणि एका ठिकाणी फेकून दिला . घरातील रक्ताचे डाग देखील त्यांनी साफ केलेले होते मात्र 22 डिसेंबर रोजी शिवम याचा मृतदेह आढळला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला .