महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना नागपुरात समोर आलेली असून instagram वर मैत्री झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका 25 वर्षीय तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सर्वस्व लुटून नेणाऱ्या एका आरोपीच्या विरोधात बजाज नगर पोलिसांनी पुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अमित सुनील मालेवार ( वय 29 राहणार अभ्यंकर नगर तुमसर जिल्हा भंडारा हल्ली राहणार बजाज नगर ) असे आरोपी प्रियकराचे नाव असून डिसेंबर 2021 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडलेला आहे . फिर्यादी तरुणीसोबत आरोपीची इंस्टाग्रामवर मैत्री झालेली होती त्यानंतर त्यांच्यात भेटीगाठी वाढल्या आणि आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत बजाज नगर येथील किरायाच्या घरात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह केला त्यावेळी त्याने लग्नाला नकार दिला . तरुणी त्याला लग्नासाठी विनवत राहिली मात्र त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आरोपीने आपली फसवणूक केल्याची जाणीव तिला झाली आणि त्यानंतर बजाज नगर पोलिसांनी फिर्याद दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बोरकर यांनी आरोपीच्या विरोधात आयपीसी 376 2 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.