चोरट्यांना आजकाल पोलिसांचे भय राहिले आहे की नाही अशी शंका उपस्थित करणारी एक घटना नागपुरात समोर आलेली असून नागपूरमध्ये एका पोलिसाच्या घराचे कुलूप तोडून चोरटा घरात शिरला आणि कपाटातील पिस्तूल आणि तिथे ठेवलेली जिवंत तीस काडतुसे घेऊन तो पसार झाला. आत्तापर्यंत गायब झालेले पिस्तूल मिळालेले नसून त्याचा वापर कोण कुठे कसा करेल ही भीती लागून राहिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , महेश लांजेवार असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते राज्य राखीव पोलीस दलातील वसाहतीमध्ये राहतात. साप्ताहिक सुट्टी असल्याकारणाने ते भंडारा येथे गेले होते याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात कुलूप तोडून प्रवेश केला आणि आत ठेवलेले पिस्तल आणि 30 जिवंत काडतूस अशी चोरून नेली
महेश हे पुन्हा नागपूरला आले त्यावेळी त्यांनी घराचे दरवाजे तुटलेले पाहिले म्हणून आत प्रवेश केला तर पिस्तूल आणि काडतुसे देखील गायब झालेली होती . एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून परिसरात खळबळ उडालेली आहे.