‘ जय हरी ‘ म्हटल्यावर घडले कल्पनेपलीकडचे , पुण्यात दोन जणांवर गुन्हा 

Spread the love

पुणे जिल्ह्यात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे. ‘ जय हरी ‘ म्हणण्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड इथं हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , प्रजा धुमाळ ( वय 28 ) आणि त्याचा साथीदार ( दोघेही राहणार बिजलीनगर चिंचवड ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून जखमी तरुणाच्या आईने चिंचवड पोलिसात धाव घेत त्यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे . 

सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा मित्राला भेटायला गेलेला होता त्यावेळी त्याची तोंडओळख असलेले दोन्ही आरोपी तिथे उपस्थित होते . फिर्यादी यांच्या मुलाने आरोपींना पाहून ‘ जय हरी ‘ असे म्हटले त्याचा आरोपींना राग आला आणि त्यांनी मुलाला मारहाण केली असे फिर्यादी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे. 


Spread the love