‘ पैसे कमवायला चाललोय ‘ असं बायकोला सांगितलं अन.. 

Spread the love

विवाहबाह्य संबंधाचे एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून तीन मुलांचा बाप दुसरे लग्न करताना पहिल्या पत्नीने रंगेहाथ पकडलेला आहे .बिहारच्या कटिहार न्यायालय प्रवेश परिसरात हा प्रकार घडला असून न्यायालयाच्या आवारातच यावेळी चांगलाच राडा झाला. 

उपलब्ध माहितीनुसार  नजूमल हक असे दुसऱ्या विवाहाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी साफिया खातून हिने त्याला रंगेहाथ पकडले आहे. सात वर्षांपूर्वी त्यांचा साफिया हिचे नजुमल याच्यासोबत लग्न झाले होते. सात वर्षात त्यांना तीन मुले देखील झाली मात्र पंधरा दिवसांपासून पती आपण पैसे कमवायला बाहेर चाललेलो आहे असे सांगत घरातून निघून गेला आणि न्यायालयाच्या आवारात दुसरे लग्न करताना आढळून आला. 

आपला पती दुसरे लग्न करतो आहे हे लक्षात आल्यानंतर पहिली पत्नी साफिया हिने तिचे सासरे अब्दुल रहमान आणि सासू रजिया यांना देखील कटिहार कोर्टात बोलावून घेतले आणि आपल्या पतीला दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतर पती-पत्नीत चांगलीच खडाजंगी झाली. पोलिस त्यानंतर साफिया आणि नजमूल यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 

साफिया हिने यावेळी माध्यमांना माहिती देताना आपल्याला आधी दोन मुली आणि एक मुलगा आहे . आता जर पतीने लग्न केले तर घर खर्च कसा चालेल ? . तीन मुलांच्या बापाशी लग्न करायला आलेली तरुणी हिने देखील आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे हे मला माहिती होते मात्र तरीदेखील मला त्याच्याशी लग्न करायचे होते असे म्हटले आहे. सद्य परिस्थितीत हा विवाह टळला असला तरी न्यायालयाच्या आवारात मात्र चांगलाच गोंधळ यामुळे निर्माण झालेला होता. 


Spread the love