ऊस पेटला म्हणून ग्रामस्थ धावले तर महिलेचा मृतदेह , भयानक कांड उघडकीस

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार कोल्हापुरात समोर आलेला असून शरीर सुखाची मागणी केल्यानंतर नकार देणाऱ्या एका महिलेला महिलेचा चक्क गळा आवळून खून करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने त्यानंतर महिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकून पेटवून देण्याचा देखील प्रयत्न केला. आजरा तालुक्यातील भादवण गावात हा प्रकार गुरुवारी रात्री घडलेला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आशाताई मारुती खुळे ( वय 42 वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून पतीचे निधन झाल्यानंतर त्या आईसोबत राहत होत्या . गुरुवारी 28 तारखेला संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील ( वय 35 वर्ष राहणार भादवन ) याने परिसरात एका रस्त्यावर महिलेला गाठले आणि उसाच्या फडात जबरदस्तीने तिला ओढत नेऊन गेला. आरोपीने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली मात्र महिलेने त्याला नकार दिला आणि विरोध केला म्हणून संशयित आरोपी योगेशने तिचा गळा आवळून खून केला. 

खून केल्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह उसाच्या फडात असल्याने त्याने ऊसच पेटवून दिला. ऊसाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी उसाकडे धाव घेतली त्यावेळी तिथे महिलेचा मृतदेह आढळून आला .पोलिसांना या प्रकरणी माहिती देण्यात आली आणि अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

महिला उसाच्या शेतात कशासाठी गेलेली होती या संदर्भात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी संशयित आरोपी योगेश पाटील हा याच रस्त्यावर जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसला शिवाय श्वानपथक देखील त्याच्याच घरापर्यंत पोहोचले त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे. आरोपीने महिलेने शरीर सुखासाठी नकार दिला म्हणून तिचा खून केल्याची कबुली दिलेली असून आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आजरा पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


Spread the love