मी सर्पमित्र जर तक्रार केली तर.., आळंदीत महिलेची पोलिसात धाव 

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून रुग्णवाहिकेमध्ये बसलेल्या एका महिले सोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्यात आल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. दोन जणांच्या विरोधात आळंदी पोलिसात यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत हा प्रकार आळंदी येथे घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गोरखनाथ दराडे ( वय 40 वर्ष ) आणि शिवप्रसाद ससाणे ( वय 41 वर्ष ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यांच्या विरोधात एका 38 वर्षीय महिलेने आळंदी पोलिसात गुरुवारी 28 तारखेला फिर्याद दिलेली आहे.  दोन्ही आरोपींवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी यांच्या म्हणण्याप्रमाणे ॲम्बुलन्समध्ये चालकाशेजारी असलेल्या सीटवर त्या बसलेल्या असताना गोरखनाथ याने महिलेसोबत अश्लील वर्तन केले आणि तिच्याबद्दल अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला. आरोपी शिवप्रसाद याने देखील अशाच पद्धतीने दहा डिसेंबर रोजी पीडित महिलेसोबत गैरवर्तन केलेले असून आरोपीने पीडित महिलेला ‘ मी सर्पमित्र असून माझी तक्रार केली तर तुझा खेळ खल्लास करीन ‘ अशी धमकी दिली. दोनदा हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने आळंदी पोलिसात आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. 


Spread the love