महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार बीडमध्ये समोर आलेला असून दुकानात बिस्किट आणण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केलेला आहे.बीड शहरातील ही घटना असून याप्रकरणी पोलीस आरोपी व्यक्तींचा तपास करत आहेत. .
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलगी किराणा दुकानात बिस्किट आणण्यासाठी गेलेली होती त्यावेळी दोन जणांनी तिला दुचाकीवरून एका खोलीत नेले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. रडत मुलगी घरी आली आणि तिने वडिलांना हा प्रकार सांगितला.
मुलीच्या वडिलांनी त्यानंतर तात्काळ पोलिसात फिर्याद दिलेली असून कृष्णा आरे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती आहे .