‘ सॉरी एक नंबर चुकला ‘ इथून सुरुवात झाली विवाहितेला मोठा फटका 

Spread the love

महाराष्ट्रात फसवणुकीचे नवनवीन प्रकार रोज समोर येत असून मुंबईतील गोवंडी परिसरात काही सायबर भामट्यांनी एका महिलेला व्हाट्सअपवर संदेश पाठवत तिच्याशी मैत्रीचे आमिष दाखवत सोने आणि अमेरिकन डॉलर तुमच्यासाठी पाठवले आहेत , असे सांगत तब्बल सहा लाख 63 हजार रुपयांना महिलेला गंडा घातलेला आहे . एका महिलेसह दोन जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून देवनार पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला या इंदिरानगर परिसरातील रहिवासी असून त्यांच्या मुलासोबत खाजगी कंपनीत नोकरी करतात. महिलेचे वय 33 वर्ष असून त्यांना काही दिवसांपूर्वी अनोळखी नंबरवरून एक व्हाट्सअप संदेश आलेला होता त्यामध्ये समोरील व्यक्तीने आपले नाव डॉक्टर मायकल विल्यम असे आहे . एक क्रमांक चुकल्याने तुम्हाला मेसेज आला असे सांगितले. 

महिलेने त्यानंतर त्यांच्याशी बोलणे सुरू केले त्यावेळी कथित आरोपी डॉक्टर विल्यम याने आपण जर्मनी येथील रहिवासी आहोत. तुमच्यासोबत बोलायला मला आवडेल असे म्हणत त्यांच्यासोबत बोलणे चालू केले. 30 नोव्हेंबर रोजी त्याने फिर्यादी महिला यांना आपण तुमच्यासाठी गिफ्ट पाठवत आहोत असे सांगितले. महिलेने त्यांना गिफ्ट नको असे देखील सांगितले मात्र तुम्हाला माझा मैत्रीचा ‘ तोहफा ‘ कबूल करावा लागेल असे म्हणत गिफ्ट पाठवलेले आहे असे सांगितले. 

एक डिसेंबर रोजी तक्रारदार महिला यांना एक फोन आला त्यामध्ये समोरील व्यक्तीने तुमचे पार्सल नेदरलँड वरून आलेले आहे आणि दिल्ली विमानतळावर तपासणीसाठी थांबवलेले आहे त्यासाठी 35 हजार रुपये भरा असे सांगण्यात आले . फिर्यादी महिला यांना बहुतेक विल्यम यांनी पाठवलेले पार्सल आलेले असेल असा संभ्रम निर्माण झाला. 

सुरुवातीला त्यांनी 35 हजार रुपये भरले त्यानंतर पुन्हा एकदा कॉल आला त्यावेळी पार्सलमध्ये सोने आणि अमेरिकन डॉलर आहेत म्हणून त्याचा दंड तुम्हाला भरावा लागेल अशी वेगवेगळी कारणे देत फिर्यादी महिला यांच्याकडून 6 लाख 63 हजार रुपये घेण्यात आले मात्र तरीदेखील कुठलेच पार्सल आले नाही. देवनार पोलीस ठाण्यात त्यांनी डॉक्टर विल्यम आणि इतर एक महिला यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. 


Spread the love