पुण्यात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून एका महिलेला आणि तिच्या पतीला तुम्हाला सिंगापूरला घेऊन टूर घडवतो , असे सांगत तब्बल एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीसात 30 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , प्रकाश सावंत असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . तीस ऑक्टोबर 2023 पासून तर 30 डिसेंबर 2023 पर्यंत इंद्रायणी नगर भोसरी येथे ही घटना घडलेली असून फिर्यादी महिलेला आणि तिच्या पतीला सिंगापूर येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी अंतर्गत तुम्हाला फिरायला नेतो असे आमिष आरोपीने त्यांना दाखवले होते.
प्रत्येकी 70 हजार दोनशे रुपये खर्च येईल असे सांगत एक लाख 40 हजार रुपये घेतले आणि त्यांना सिंगापूरला घेऊन गेला नाही . एमआयडीसी पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.