महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना कोल्हापुरात समोर आलेली असून एका निर्दयी महिलेने स्वतःच्या एक दिवसाच्या नवजात शिशुला अक्षरशः कचऱ्यात फेकून दिलेले होते. महापालिका कर्मचारी कचरा भरत असताना स्त्री जातीचे अर्भक त्यांना आढळले त्यानंतर त्यांनी सेवा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले . कसबा बावडा इथे रविवारी हा प्रकार समोर आलेला असून शाहूपुरी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेक पालकांची इच्छा असल्याने दुसऱ्यांदा मुलगी झाली तर असे प्रकार काही पालक करत असून विशेष म्हणजे या अर्भकाची आयुष्याची दोरी बळकट होती त्यामुळे मोकाट कुत्र्यांनी तिला काही इजा केली नाही . घंटागाडीवर काम करणारे चालक बापू घाडगे यांना कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीच्या समोर हे नवजात अर्भक आढळून आलेले होते. थोडासा जरी उशीर झाला असता तरी तिच्या जीविताला काहीही धोका होऊ शकला असता.
‘ नकोशी ‘ असलेली ही मुलगी दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली आणि अवघ्या काही मिनिटात पोलीस तिथे पोहोचले . अनेकदा अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अपत्याला देखील सांभाळणे नको म्हणून असे प्रकार केले जातात मात्र बापू घाडगे यांनी तात्काळ याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर या नकोशीचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत.