महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आलेला असून एकटी घरात असलेल्या एका गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला गोंदिया जिल्हा न्यायालय क्रमांक दोन आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , निळकंठ प्रभू कावळे ( वय 33 वर्ष राहणार महारीटोला तालुका खामगाव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून ही घटना 15 मार्च 2017 रोजी घडलेली होती. आरोपीने फिर्यादी यांच्या तीस वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार केला होता .पीडित कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने घरचे व्यक्ती बाहेर गेलेले असताना आरोपी घरी आला आणि त्याने हा प्रकार केला यातून या मुलीला गर्भधारणा झाली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली होती .