‘ चल बस माझ्या गाडीवर ‘, म्हणत हुकूम गाजवणारा प्रियकर गेला पळून 

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार नागपूरमध्ये समोर आलेला असून दुचाकीवर बसण्यास एका तरुणीने प्रेयसीने नकार दिला म्हणून संतापलेल्या प्रियकराने भर रस्त्यात तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. प्रेयसीने अखेर एमआयडीसी पोलिसात आरोपी प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे 

उपलब्ध माहितीनुसार , संकेत मेश्राम ( वय पंचवीस वर्ष राहणार मोहाडी जिल्हा भंडारा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एमआयडीसी मध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीसोबत ओळख झालेली होती. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात संभाषण वाढले आणि त्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या. त्यांच्यात प्रेम प्रकरण देखील सुरू झाले मात्र आरोपी संकेत हा सतत फिर्यादी यांच्यावर हुकूम गाजवायचा असे त्यांचे म्हणणे आहे 

14 एप्रिल रोजी संध्याकाळी संकेत याने फिर्यादी यांना घराबाहेर भेटण्यासाठी बोलावलेले होते मात्र फिर्यादी गेल्या नाहीत म्हणून आरोपी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना मारहाण केली त्यानंतर त्यांच्यात संभाषण बंद झाले . मोबाईलवर व्हाट्सअप च्या माध्यमातून एकमेकांना मेसेजिंग सुरू होते. 27 डिसेंबर रोजी आरोपी फिर्यादींच्या घरी पुन्हा आला आणि दुचाकी वर बसण्यास सांगितले मात्र फिर्यादी यांनी नकार दिला म्हणून संकेत याने त्यांना मारहाण केली आणि त्यांच्यासोबत रस्त्यावर अश्लील चाळे केले. संकेत याच्या तापट स्वभावाला कंटाळलेल्या प्रेयसीने एमआयडीसी पोलिसात अखेर त्याच्या विरोधात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तात्काळ फरार झालेला आहे. 


Spread the love