सासऱ्याला दारू पाजून जावई सासूसोबत फरार , तब्बल इतक्या वर्षांचा फरक 

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण राजस्थानमधून समोर आलेले असून राजस्थानच्या सिरोही इथे एका महिलेचा चक्क तिच्या जावयावर जीव जडला . जावई तिच्यासोबत गोड गोड बोलायचा त्यामुळे महिलेला भुरळ पडली आणि अखेर तिने जावयापुढे आपल्या मनातील काय ते सांगून टाकले . जावयाला देखील सासू बद्दल प्रेम निर्माण झाले आणि त्यांनी विरोध होईल या भीतीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.  सासू आणि जावई घरातून पळून गेल्यानंतर परिसरात याप्रकरणी जोरदार चर्चा सुरू झाली

उपलब्ध माहितीनुसार , जावयाच्या अखंड प्रेमात बुडालेली सासू हिचे वय 40 वर्षे असून जावई 27 वर्षांचा आहे . 27 वर्षांचा जावई वारंवार सासुरवाडीला येत असायचा त्यामुळे त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले. तासंतास दोघे एकमेकांशी फोनवर बोलायचे. सासू सोबत बोलत आहे म्हणून ती दुर्लक्ष करत असायची मात्र त्याचा तिला चांगलाच फटका बसला. 

दोघांमधील प्रेमप्रकरण वाढू लागले आणि अखेर सासू आणि जावई घरातून पळून गेले. जावई सियाकरा येथील असून या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली . राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर सिरोही जिल्ह्यातील ही लव स्टोरी असून सासू आणि सासरे वगळता घरी कोणी नसताना जावई त्यांच्या घरी पोहोचलेला होता. 

सासऱ्या सोबत मद्य प्राशन करण्याचे नाटक त्याने केले आणि सासऱ्याला दारू पाजली आणि त्यानंतर सासूसोबत त्याने पलायन केले . पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली असून फरार झालेल्या या जोडप्याचा तपास सुरू केलेला आहे त्यांना या प्रकरणी कोणी मदत केली याचा देखील सध्या पोलीस तपास करत आहेत. 


Spread the love