महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली असून तीन दिवसांपासून पती घरी न आल्याने त्याबाबत सासरच्यांकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या नवविवाहित महिलेला दिराने चक्क शरीर सुखाची मागणी करून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. सासर्याने देखील नवविवाहितेला वाईट भावनेने स्पर्श केला म्हणून घाबरलेल्या पीडित महिलेने तिथून पलायन करत रविवारी दीर आणि सासऱ्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
उपलब्ध माहितीनुसार , पीडित तरुणीचे ऑगस्ट महिन्यात लग्न झालेले असून ती रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे सासरे व दीर हे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पती घरी आला नाही म्हणून पीडित नवविवाहिता शनिवारी संध्याकाळी सासरच्या घरी चौकशीसाठी गेली असता ‘ तुझा पती मरून गेला ‘ असे उद्धटपणे उत्तर दिले.
पीडितेने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले मात्र त्यानंतर दिराने तिला बेडरूम मध्ये नेऊन शरीरसुखाची मागणी केली आणि तिच्या पतीत बद्दल देखील अपशब्द वापरला. सासर्याने देखील सुनेची बाजू घेण्याऐवजी तिला वाईट हेतूने स्पर्श करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली . पीडितेने कशीबशी आपली तिथून सुटका करून घेतली आणि मानलेल्या बहिणीकडे पलायन केले. त्यानंतर तिने आपल्या मानलेल्या बहिणीसोबत चर्चा करून रविवारी सकाळी शहर पोलीस ठाणे गाठून आपला दीर आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.