महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण बीडमध्ये समोर आलेले असून लग्न करून आणलेली नवरी अवघ्या पाच दिवसात खरेदीला जाते म्हणून धूम ठोकून निघून गेलेली आहे . लग्न लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने भरभक्कम रक्कम लग्नाआधीच घेतलेली होती त्यानंतर लग्न लागले आणि पाचच दिवसात नवरदेवाच्या कुटुंबीयांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली.
उपलब्ध माहितीनुसार , बीडच्या आष्टी शहरातील हे प्रकरण असून मध्यस्थ व्यक्तीला दोन लाख रुपये लग्न देऊन एका फळ विक्रेत्याने लग्न केलेले होते. लग्न लागल्यानंतर अवघ्या पाच दिवसात कुटुंबीयांना आपण खरेदी करण्यासाठी बाहेर जात आहोत असे नवरीने सांगितले आणि त्यानंतर गुंगारा देऊन ती पळून गेली . आष्टी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या सर्व प्रकारामागे टोळके असल्याचा संशय दिसून येत आहे .
आष्टी शहरातील फिर्यादी व्यक्ती यांना आरोपी माधव रामजी भालेराव ( राहणार मुसळ तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली ) याने दोन लाख रुपये देऊन मुलगी दाखवली होती . मुलाला मुलगी पसंत पडल्यानंतर पाहण्याचा कार्यक्रम झाला त्याच ठिकाणी हार घालून तात्काळ विवाह कर लावण्यात आला . विवाह लागल्यानंतर आरोपीने लगेच दोन लाख रुपयांची मागणी केली आणि या फळविक्रेत्याने दोन लाख रुपये देखील त्याला दिले.
पुन्हा आष्टी शहरात विवाह लावण्यात आला आणि लग्नाच्या पाच दिवशी नववधू फरार झालेली असून वराने संपर्क केला त्यावेळी तिचा फोन देखील बंद होता . मध्यस्थ व्यक्तीला संपर्क केल्यानंतर त्याने ती आजारी असेल म्हणून फोन उचलत नसेल एक-दोन दिवसात येईल असे सांगत फिर्यादी यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र नववधू परत आली नाही. फिर्यादी व्यक्ती यांनी आष्टी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.