देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून विशाखापट्टणम येथील ही घटना आहे . घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक बलात्कार केलेला असून या प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे . पीडित मुलगी ही ओडीसा राज्यातील रहिवासी असून आंध्र प्रदेश मध्ये विशाखापट्टणम येथे ती कामाला होती .
उपलब्ध माहितीनुसार , अल्पवयीन मुलीवर आधी तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला त्यानंतर ही मुलगी आर के बीचवर आयुष्याचा शेवट करण्याच्या उद्देशाने येऊन पोहोचली होती . तिथे फोटोग्राफीसाठी आलेल्या काही व्यक्तींनी तिच्यासोबत बोलायला सुरू केले आणि तिला ओडिसाला नेऊन सोडू असे देखील आमिष दाखवले . आरोपी फोटोग्राफर टीमने त्यानंतर तिच्यावर अनेक दिवस बलात्कार केला. सदर घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 11 जणांना अटक केली आहे तर दोन जण आत्तापर्यंत फरार आहेत.
पीडित मुलगी नऊ महिन्यांपूर्वी ओडीसा राज्यातून विशाखापट्टणमला कामासाठी आली होती. . 17 डिसेंबर रोजी ती बेपत्ता झाली म्हणून तिच्या वडिलांनी ती हरवल्याची फिर्याद दिलेली होती . 23 डिसेंबर रोजी मुलीच्या वडिलांना ओडिसा पोलिसांकडून फोन आलेला होता . पीडित मुलीला त्यांनी 25 डिसेंबर रोजी आपल्या घरी आणले त्यावेळी मुलीला मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसलेला होता. 31 डिसेंबर रोजी तिने आई-वडिलांना आपल्याविषयी झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली .
मुलीने म्हटल्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी ती प्रियकरासोबत एका ठिकाणी गेलेली होती त्यावेळी तिथे प्रियकराचा मित्र देखील होता . आर के बीच जवळ असलेल्या एका लॉजवर प्रियकर आणि त्याचा मित्र या दोघांनीही आपल्यावर जबरदस्ती करत शरीर संबंध ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तिला तिच्या कामाच्या ठिकाणी नेऊन सोडले .
आपल्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आपण आयुष्याचा शेवट करणार होतो म्हणून बीचवर पोहोचलो त्यावेळी तिथे फोटोग्राफर्स म्हणून आलेले राजू , हरीश , नागेंद्र , गोपी यांच्यासोबत बोलणे झाल्यावर त्यांनी आपल्याला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जवळच्या लॉजवर घेऊन जाऊन पुन्हा आपल्यावर 22 डिसेंबरपर्यंत अत्याचार केले . 23 डिसेंबर रोजी एका आरोपीने तिच्या हातात दोनशे रुपये देऊन ओडिसा ला जाणाऱ्या रेल्वे स्टेशन जवळ नेऊन सोडले असे म्हटलेले आहे. तिने त्यानंतर पोलिसांशी संपर्क केला आणि या प्रकरणाला वाचा फुटली.