महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण इथे समोर आलेली असून पैठण येथील एका तेरा वर्षाच्या मुलावर तरुणाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. सदर प्रकरणी पोलिसात अनैसर्गिक कृत्य आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सागर सुभाष पहिलवान ( राहणार नारळा पैठण ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने पीडित मुलाला गीता मंदिर रस्त्यावर थांबवत तुझे उसने घेतलेले पैसे देतो असे सांगत अंधारात झुडपात घेऊन गेला आणि तोंड दाबत त्याच्यावर अत्याचार केला. दोन जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
पीडित बालक हा रडत रडत घरी आला आणि त्याने आपली व्यथा घरच्यांना सांगितली त्यानंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे यांनी याप्रकरणी माहिती देताना आरोपी सागर पहिलवान याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल आहेत असे म्हटलेले आहे.