महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या मुंबईतील गोवंडी परिसरात समोर आलेले असून प्रेम संबंधाला नकार दिल्याच्या रागातून एका बावीस वर्षीय माथेफिरू व्यक्तीने शिकवणीसाठी घराबाहेर पडलेल्या अवघ्या सोळा वर्षाच्या मुलीला चाकूच्या धाकावर आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. गोवंडी इथे हा प्रकार घडलेला असून आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , कृष्णा शर्मा असे आरोपी व्यक्तीचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्या विरोधात धमकी , अपहरण आणि बलात्कार आणि पोक्सो या कायद्याअंतर्गत त्याला बेड्या ठोकल्या आहेत . पीडित तरुणी ही शालेय शिक्षण घेत असून मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शिकवणीसाठी म्हणून घराबाहेर पडलेली होती.आरोपीने तिला घराबाहेर अडवले आणि जुन्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळ घेऊन गेला.
आरोपीने त्यानंतर तिला रिक्षामध्ये बसवत ट्रॉम्बे महाराष्ट्र नगर येथील त्याच्या घरी नेले आणि त्याच्या घरात तिच्यावर बलात्कार करत या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून धमकावले. मुलीने स्वतःला सावरत ही घटना कुटुंबीयांना सांगितलेली असून त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे .