अन ‘ ते ‘ खडे घेण्यास पोलिसच पोहचले ग्राहक बनून , किंमत इतकी की.. 

Spread the love

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून राशीनुसार खडे वापरल्यानंतर आपले नशीब बदलते आणि धनलाभ होतो व्यवसायात प्रगती होते असा अंधविश्वास असणाऱ्या नागरिकांना किमती खडे आपल्याकडे आहेत असे भासवत स्वस्तात विक्री करण्याचे करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे . विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीसच ग्राहक बनून आरोपी पर्यंत पोहोचले होते. 

उपलब्ध माहितीनुसार , किमती खड्यांची स्वस्तात विक्री करण्याचे एक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून परिमंडल उपयुक्त प्रशांत कदम यांना मिळालेली होती. काहीजण दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरात ते येणार आहेत अशी माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक अवधूत बनकर यांच्या पथकाने आरोपींसाठी सापळा रचला होता. 

ज्यांच्याकडे आपण ग्राहक म्हणून जाणार आहोत तेच पोलीस आहेत याची आरोपींना कुठलीही कल्पना आली नाही आणि अलगदपणे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले . सर्व आरोपी हे पालघर मधील रहिवासी असून संजू खान ( वय 58 )  राजस्थानचा रहिवासी जितेंद्र कुमार ब्राह्मण , गुजरातचा रहिवासी प्रकाश टेलर ( वय 50 ) मुंबईतील रहिवासी शैलेश चव्हाण ( वय 45 ) , भालचंद्र तिलोड उर्फ दीपेश ( वय सत्तेचाळीस ) आणि मोहम्मद इरफान शेख ( वय 43 ) अशा सहा जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. माटुंगा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे नीलम रुबी पुष्कराज ओपेल असे खडे सापडलेले पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत या खड्यांची किंमत सुमारे तीन ते चार कोटी रुपये आहे असे सांगितले आहे . बनावट खडे देऊन ग्राहकांची ते फसवणूक करायचे असे असा दावा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. 


Spread the love