एक धक्कादायक असे प्रकरण पुण्यात समोर आलेले असून पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक यानेच एका तरुणीवर अनेकदा अत्याचार केलेले असून आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवलेले होते . पोलीस उपनिरीक्षक व्यक्तीने त्यानंतर मात्र तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
उपलब्ध माहितीनुसार , युवराज शिंदे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. आरोपी युवराज शिंदे आणि त्याची पत्नी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाणेर इथे राहणाऱ्या एका 32 वर्षे तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत . आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला आणि गोड बोलून तिच्याकडून वेगवेगळ्या भेटवस्तू देखील घेतल्या. आरोपीने तिला पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी लॉजमध्ये घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिला टाळण्यास सुरुवात केली.
फिर्यादी तरुणीने त्याला लग्नासाठी तगादा सुरू केला त्यावेळी त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या अंगावर धावून जात तिला मारहाण देखील केली . पीडित तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केलेला होता मात्र घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आलेला आहे.