महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार मुंबईत समोर आलेला असून सोशल मीडियावर शहर ट्रेडिंग बाबत एक माहिती फिरत होती . शेअर ट्रेडिंगच्या या आमिषाला समोरील व्यक्ती भुलले आणि त्यानंतर यामध्ये त्यांची तब्बल नऊ लाख 37 हजार रुपयांची फसवणूक झालेली आहे . मुलुंड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मुलुंड पश्चिम येथील गोरेगाव लिंक परिसरात 46 वर्षीय तक्रारदार हे एका नामांकित कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत असून 15 ऑक्टोबरच्या रात्री इंस्टाग्रामवर त्यांना शेअर मार्केट संदर्भात एक जाहिरात दिसलेली होती. उत्सुकतेपोटी त्यांनी या जाहिरातीवर क्लिक केले आणि त्यानंतर ते एका व्हाट्सअप ग्रुप सोबत जोडले गेले. सदर ग्रुप हा रामा नावाचा व्यक्ती आणि त्याची सहाय्यक असलेली मीरा ही चालवत होते.
शेअर मार्केट बाबतच्या सूचना बघून तक्रारदार ट्रेडिंग करू लागले त्यानंतर मीरा हिने त्यांना शेअर ट्रेनिंगच्या माध्यमातून चांगले प्रॉफिट मिळून देण्याचे आमिष दाखवत एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करून फिर्यादी यांनी स्वतःचे अकाउंट सुरू केले . शेअर ट्रेडिंग साठी जमा करण्यात आलेली रक्कम अवघ्या काही दिवसात तुम्हाला परत मिळेल असे सांगत फिर्यादी यांना आरोपींनी जाळ्यात ओढलेले होते.
तक्रारदार व्यक्ती यांनी 15 ऑक्टोबर ते सहा डिसेंबरच्या काळात नऊ लाख 37 हजार रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यानंतर त्यांना कागदोपत्री सुमारे एक लाख 71 हजार 682 इतकी रक्कम डॉलर्समध्ये दिसू लागली . रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यावेळी या रकमेच्या पाचपट रक्कम तुम्हाला आधी भरावी लागेल असे सांगण्यात आले म्हणून त्यांना संशय आला. आरोपींकडे त्यांनी याप्रकरणी विचारणा केली मात्र टोलवाटोलवी देणारी उत्तरे त्यांना ऐकावी लागली अखेर त्यांनी मुलुंड पोलीस ठाणे गाठत आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.