पुण्यामध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पिंपरी इथे एका कारला पाठीमागून जोरदार धडक देत कारचे नुकसान केल्यानंतर कारचालक महिलेने आणि तिच्या मित्राने समोरील कारचालकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक तारखेला हा प्रकार संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई बंगलोर महामार्गावरील वाकड पुलाजवळ घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सिद्धार्थ सुरेश नायर ( वय 27 राहणार हिंजवडी ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मनीषा शिवाजी कुदळे ( वय 32 राहणार धनकवडी पुणे ) आणि यश पांडुरंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्यादी व्यक्ती असलेले नायर हे त्यांच्या कारमधून मुंबई बंगलोर महामार्गाने जात होते . वाकड पुलाजवळ त्यांच्या कारला पाठीमागून एका कारने जोरदार धडक दिली त्यामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले मात्र ज्यांनी धडक दिली त्याच आरोपींनी कार बाहेर येऊन त्यांना शिवेगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्या अंगावर जात कापून टाकतो अशी धमकी दिली हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.