महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका खाजगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये मालेगाव पासून धुळ्यापर्यंत प्रवास करत असताना प्रवासी महिलेसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न एका ट्रॅव्हल मधील वाहकाने केलेला आहे . धुळे शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , किशोर छगन पाटील ( राहणार खाजोळ तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ) असे विनयभंग प्रकरणातील आरोपीचे नाव असून देवपुरा येथील एक 26 वर्षीय महिला सहा तारखेला मुंबईतील श्री गणेश ट्रॅव्हल्स बस मधून मालेगाव वरून धुळ्याकडे येत होती याच दरम्यान आरोपीने तिच्यासोबत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि परिचय वाढवण्यासाठी तिचा पाठलाग देखील केला .
फिर्यादी महिलेने त्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 354 ड एक अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.