महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण लातूर जिल्ह्यात समोर आलेले आहे . लातूर जवळील रेणापूर तालुक्यातील ही घटना असून अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केलेला असून प्रकार रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख इथे सहा तारखेला हा प्रकार समोर आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , वैभव ज्योतीराम निकम असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी नेहा वैभव निकम आणि तिचा अल्पवयीन प्रियकर यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. टेम्पोचालक असलेला वैभव हा त्याची पत्नी एक मुलगा आणि मुलीसह गावात राहत होता . मंगळवारी दोन तारखेला वैभव कुणालाही काही न सांगता निघून गेला आणि तो पुन्हा आलाच नाही.
वैभव याचा भाऊ सुरज याने शुक्रवारी पाच तारखेला रेणापूर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली मात्र याच दरम्यान सहा तारखेला श्रीराम पवार नावाच्या एका व्यक्तीच्या शेताजवळ वैभव याचा मृतदेह आढळून आलेला होता. रेणापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जागेवर पोहोचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
मयत वैभव यांचा अंत्यविधी झाल्यानंतर सुरज यांनी याप्रकरणी माझी भाऊजई आणि तिचा प्रियकर यांना माझ्या भावाने एकदा एकत्र पाहिलेले होते त्यावरून त्यांच्यात वाद झालेले होते अशी माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी नेहा निकम हिची कसून चौकशी केली त्यावेळी तिने मी आणि माझा अल्पवयीन प्रियकर यांनी मिळून वैभव याचा खून केलेला आहे याची कबुली दिलेली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताने माखलेली गोधडी घराच्या पाठीमागे जाऊन जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असे देखील समोर आलेले आहे. अल्पवयीन प्रियकर हा या दाम्पत्याच्या घराजवळ राहत होता याच दरम्यान नेहा आणि त्याचे अनैतिक संबंध जुळले आणि त्यात वैभव हा अडसर ठरत होता म्हणून त्यांनी वैभव यांचा खून केल्याची बाब समोर आलेली आहे.