शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका परिचारक तरुणीला अश्लील व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल करेल अशी धमकी देत तिच्याकडे खंडणी मागण्यात आलेली आहे . चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अमनप्रीत सिंग असे या भामट्याचे नाव असून आपण लंडनमधील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहोत अशी बतावणी त्यांनी केलेली होती. फिर्यादी तरुणी ही त्याच्यासोबत बोलू लागली त्याचा गैरफायदा घेत त्याने त्यानंतर या तरुणीला धमकवण्यास सुरुवात केलेली होती. त्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संपर्क झालेला होत