महाराष्ट्रात एक खळबळ जनक असा प्रकार नाशिक इथे समोर आलेला असून एका तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ‘ मी आत्महत्या करेल ‘ असे म्हणत एका तरुणासह त्याच्या साथीदाराने तिच्याकडून तब्बल चार लाख रुपयांची खंडणी वसूल केलेली आहे . पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर निफाड येथील दोन जणांवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे प्रकरण असून सप्टेंबर 2019 पासून तर जानेवारी 2024 पर्यंत पीडित तरुणीकडे खंडणी मागण्यात आलेली होती . संशयित व्यक्ती पैकी एकाने तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवत तिचे काही व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती .
घाबरून गेलेल्या तरुणीने त्यानंतर टप्प्याटप्प्याने करत त्यांना चार लाख 28 हजार रुपये दिले मात्र त्यानंतर देखील आरोपींकडून असाच प्रकार सुरू असल्याकारणाने तिने पोलिसात फिर्याद दिलेली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करत असल्याची माहिती आहे.