‘ आत्याचा मुलगा ‘ असल्याने घरी यायचा अन.. , सिंहगड पोलीस ठाण्यात तरुणीची धाव

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर नऊ तारखेला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . आरोपीने मागील चार वर्षांपासून पीडित तरुणीच्या घरी, खेड शिवापूर , बोपदेव घाट या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अनेकदा अत्याचार केला.  पीडित तरुणी ही नऱ्हे येथील रहिवासी असून सिंहगड पोलीस ठाण्यात तिने फिर्याद दिलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आरोपी तरुण हा फिर्यादीच्या आत्याचा मुलगा असून त्याने तिला लग्नाची आमिष दाखवले आणि त्यामुळे तिच्या घरी जाऊन अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले . सदर प्रकाराचे आरोपीने व्हिडिओ देखील बनवले आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो देखील मोबाईल मध्ये काढून घेतले . हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला तो ठीक ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत असायचा असे तिने म्हटलेले आहे. 


Spread the love