महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख बनवून त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून असाच एक प्रकार मुंबईत समोर आलेला आहे . सायबर भामट्यांनी मालाड येथील एका साठ वर्षीय वृद्ध व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याला आपली शिकार बनवले. आरोपींनी त्याच्याकडे 75 हजार रुपयांची मागणी केलेली होती त्यानंतर फिर्यादी व्यक्ती यांनी त्यांच्या धमकीला भीक न घालता मालवणी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात पीडित साठ वर्षीय व्यक्ति राहत असून आठ जानेवारी रोजी त्यांना अंकिता गुप्ता नावाच्या एका अकाउंट वरून फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती . सुंदर मुलीचा फोटो पाहिल्यानंतर साठ वर्षीय वृद्ध पाघळले आणि त्यांनी ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केली . समोर बोलणाऱ्या तरुणीने त्यांचा गोड बोलून व्हाट्सअप क्रमांक मिळवला आणि त्यानंतर व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करून नको तो प्रकार करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी व्यक्ती यांनी कॉल उचलला त्यावेळी त्यांना समोरील प्रकाराचा काहीच अंदाज नव्हता मात्र या तरुणीने आणि तिच्या टोळक्याने त्यानंतर तुम्ही तिच्यासोबत व्हिडिओ कॉल वर संभाषण केलेले आहे . तुमचे हे रेकॉर्डिंग सोशल मीडियात व्हायरल करून देऊ आणि तुमचे मित्र मैत्रिणी यांना देखील पाठवू , असे सांगत 75 हजार रुपये खंडणी मागितली.
तक्रारदार व्यक्ती यांनी त्यानंतर तात्काळ मालवणी पोलीस ठाणे गाठत आरोपींच्या विरोधात तक्रार दिलेली आहे . अंकिता गुप्ता नावाच्या फेसबुक अकाउंटच्या विरोधात तसेच ज्या नंबर वरून फोन आलेले होते त्या मोबाईल धारकांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 365 यासोबत माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.