महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना मुंबईतील मालाड परिसरात समोर आलेली असून कौटुंबिक वादातून बेसबॉलच्या बॅटने पत्नी आणि भावाची हत्या करणाऱ्या एका चाळीस वर्षीय आरोपीला पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात आलेली आहे . हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या दोन महिन्यांच्या मुलीला घरात सोडून पळ काढलेला होता.
उपलब्ध माहितीनुसार , चित्रा डीसा ( वय 35 ) असे मयत महिलेचे नाव असून 29 डिसेंबर रोजी बंगल्यातील दिवाणखान्यात त्या रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या होत्या. त्यांच्या शरीरावर अनेक खुणा होत्या . महिलेचा दिर असलेला डेमियन डिसा ( वय 45 ) हा देखील गंभीर अवस्थेत होता . त्याच्या देखील डोक्यावर आणि अंगावर जखमा होत्या मात्र उपचार सुरू असताना डेमियन याचा मृत्यू झाला.
मोलकरीण असलेल्या आशा वानखेडे 29 तारखेला कामावर आलेल्या होत्या त्यावेळी हा प्रकार समोर आला. डेमियन यांची पत्नी बिंदू हिला कॉल करून त्यांनी माहिती दिली त्यावेळी बिंदू तिथे आली आणि आत मध्ये डॅनियल जखमी अवस्थेत आढळून आलेला होता तात्काळ बांगुर नगर पोलिसांना या प्रकरणी माहिती देण्यात आली आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार आरोपीचे पत्नी आणि भावासोबत संपत्तीच्या वादा बंगला विकण्यावरून वाद सुरू झालेले होते आणि हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत देखील पोहोचला मात्र कौटुंबिक वाद असल्याकारणाने पोलिसांनी यावेळी सबुरीने प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिलेला होता . विशेष म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर तो मुंबईवरून गोव्याला आणि गोव्यावरून बंगळूर येथे पोहोचला . तब्बल बाराशे ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपीचे लोकेशन पोलिसांना सापडले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.