काही घर देतो म्हणाला तर काहींना नफ्याचे आमीष , पुण्यात पोलिसाचा कारनामा 

Spread the love

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून एका व्यक्तीने ‘ मी टिशू पेपरची फॅक्टरी सुरू करणार आहे तुम्हाला त्यामध्ये नफा मिळवून देतो ‘ असे सांगत तब्बल पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातलेला आहे . धक्कादायक बाब म्हणजे पुणे लोहमार्ग पोलिसांच्या श्वानपथकातील पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अभिजीत पाटील ( वय 45 ) यांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून 2016 पासून तर 2024 पर्यंत त्यांची ही फसवणूक करण्यात आलेली आहे . इमरान इकबाल पटेल या व्यक्तीने तब्बल 11 जणांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर काहींना घर देतो तर काहींना टिशू पेपरची फॅक्टरी साठी इन्व्हेस्टमेंट म्हणून आरोपीने भुलवले आणि परताव्याचे आम्हीच दाखवत त्यांची फसवणूक केली. 

आरोपी इमरान इक्बाल पटेल याने दादर इथे भवानी शंकर रोड परिसरात आपल्या मालकीची मोकळी जागा असून तिथे बांधकाम करणार आहोत . 45 लाख रुपयात तुम्हाला तिथे घर मिळून देतो असे सांगत फिर्यादी यांनी त्या विश्वासाने 17 लाख रुपयांची गुंतवणूक केली मात्र त्यांना घर काही मिळाले नाही . अशाच पद्धतीने पोलीस दलातील निवृत्त झालेल्या देखील एका व्यक्तीची त्यांनी फसवणूक त्याने फसवणूक केलेली असून पोलीस या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे याचा तपास करत आहे. 


Spread the love