देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून एका महिलेला लग्न करण्याची सवय लागली आणि त्यातून तिने आत्तापर्यंत तब्बल पाच लग्न केली . आपल्या पत्नीने पाचवे लग्न केल्याची पतीला माहिती समजली आणि त्यानंतर पती नैराश्यात गेला आणि अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील इंदोर येथील हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुनील लोहानी असे मयत व्यक्ती याचे नाव असून सुनील हा विशेष म्हणजे या महिलेचा चौथा पती होता . महिलेने 2018 मध्ये त्याच्यासोबत लग्न केले मात्र गेल्यावर्षी त्यांच्यात नात्यात दुरावा आला आणि ही महिला अखेर वैतागून आई-वडिलांकडे राहायला गेली. सुनील यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सुनील यांनी पेटून घेतले होते त्यानंतर त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र अखेर त्यांचा मृत्यू झालेला आहे. सुनील यांचे वय 35 वर्षे होते.