संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडून देणाऱ्या 5 जानेवारी रोजी झालेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत मात्र या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी देखील पुढाकार घेतला असून संघटनेकडून एक खळबळजनक असा आरोप करण्यात येत आहे . हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानुसार जर्मन बेकरी स्फोट यातील संशयित दहशतवादी कातील सिद्धकी याच्या हत्येचा बदला म्हणून शरद मोहोळ यांच्या हत्येचा कट परदेशात रचण्यात आला असा दावा करण्यात आलेला आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणासंदर्भात मिलिंद एकबोटे यांच्यासह काही हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेत हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला त्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडत नाही . गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही, पिस्तूल सापडले त्याचा तपास नाही या पाठीमागे राजकीय दबाव आहे असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे.
शरद मोहोळ यांनी गोरक्षण चळवळ वाढवलेली होती तसेच कातिल सिद्दीकी याची हत्या केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होता त्यामुळे काही अतिरेकी संघटनांनी कटकारस्थान करून हा प्रकार केलेला आहे का ? याचा देखील तपास होणे गरजेचे आहे म्हणून शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास यंत्रणा अर्थात एन आय ए यांच्याकडे सोपविण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
28 जानेवारी 2024 ला यासंदर्भात एक मोर्चा देखील काढण्यात येणार असून किनारा हॉटेल पासून श्री छत्रपती शिवाजी स्मारक कोथरूड इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे . मिलिंद एकबोटे यांनी जे आरोपी आहेत ते सामान्य आहेत त्यांना पैसे देऊन वापरलेले आहे मात्र या मागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे असे म्हटलेले आहे.