महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सोलापूरमध्ये समोर आलेले असून लग्नाचे आमिष दाखवत हैदराबाद रोडवर एका नर्सरीमध्ये महिलेला घेऊन जात तिच्यावर एका ड्रायव्हरने रात्री बलात्कार केलेला आहे . धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ही दिव्यांग आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपी हा मार्केट यार्ड परिसरात अन्नधान्याचा माल खाली करण्यासाठी येत असायचा त्यावेळी फिर्यादी महिले सोबत त्याची ओळख झालेली होती . ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर आरोपीने एका रात्री तिला हैदराबाद रोडवरील एक नर्सरीत घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला.
एकदा अत्याचार केल्यानंतर वारंवार तो मार्केट यार्ड इथे यायचा आणि तसाच प्रकार करायचा. दोघांनी त्यानंतर खोली भाड्याने घेऊन एकत्र राहायला सुरू केले आरोपी याने त्यानंतर आपण सोबत राहणारच आहोत असे सांगत बचत गटाकडून महिलेने काढलेले एक लाख 70 हजार रुपये सोबतच नातलगांकडून घेतलेले एक लाख रुपये असे जमा करून घेतले आणि त्यानंतर तो फरार झाला.
गणेश राजेंद्र चिमकुले ( राहणार जळकोट ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून वृत्त लिहीपर्यंत आरोपी ताब्यात आलेला नाही.