आईचा मित्र म्हणून घरी यायचा अन.., पीडिता म्हणतेय की त्याने एकदा..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या मुंबईतील भांडुप परिसरात समोर आलेले असून एका 14 वर्षीय मुलीवर आईच्या मित्राने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे . आरोपीने पीडित मुलीला आणि तिचा लहान भाऊ तसेच आईला ठार मारण्याची धमकी देत हे कृत्य केलेले असून भांडुप पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मागील वर्षी एक नोव्हेंबरपासून आरोपी हा पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार करत होता . मुलीच्या आईसोबत असलेल्या मैत्रीचा फायदा घेत आरोपी घरी यायचा आणि त्यानंतर मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करायचा . आरोपीने त्यानंतर तिला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या जंगलात घेऊन जात तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. 

आरोपीकडून होत असलेल्या या त्रासाला पीडित मुलगी ही कंटाळून गेली आणि त्यानंतर तिने भांडुप पोलिसात तक्रार दिलेली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.  पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपी वारंवार हा प्रकार करत होता. आईचा मित्र असल्याचा कारणाने तो घरात घुसायचा आणि त्यानंतर आपल्या सोबत अशी कृत्य करण्यास त्याने सुरू केले असे म्हटलेले आहे . 


Spread the love