महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार लातूरमध्ये समोर आलेला असून लग्नाचे आमिष दाखवत शेजारी राहणाऱ्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा दुष्कर्म केले आणि त्यात पीडित मुलीला दिवस गेले आणि अखेर तिने एका गोंडस बाळाला जन्म देखील दिला . विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , कुणाल बंडू बनसोडे ( वय 21 वर्ष राहणार अंजली नगर लातूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने त्याच्या शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली . सातत्याने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर या मुलीला दिवस गेले आणि पोटात दुखू लागल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.
अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि अखेर शासकीय रुग्णालयात ती बाळंत झाली. आरोपीचे नाव विचारले त्यावेळी तिने कुणाल बंडू बनसोडे असे नाव सांगितलेले असून आरोपीच्या विरोधात त्यानंतर बलात्कार आणि पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर याप्रकरणी तपास करत आहेत.