शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर आरोपीने तिचा खदानीत ढकलून खून केलेला आहे . 9 जानेवारी रोजी खराबवाडी येथे स्टोन क्रशरच्या एका खदानीत ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , देवेंद्र कुमार श्यामलाल लोधी ( वय 27 वर्ष राहणार खराबवाडी तालुका खेड मूळ राहणार मध्य प्रदेश ) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे . त्याच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलिसात फिर्याद देण्यात आलेली आहे.
मयत महिला आणि आरोपी यांचे 2010 पासून प्रेमसंबंध होते . महिलेचे 2018 मध्ये लग्न झाले मात्र पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी ती माहेरी येऊन राहू लागली त्यानंतर देवेंद्र सोबत तिचे बोलणे होऊ लागले आणि देवेंद्र कुमार याची देखील भावाच्या मेहुणी सोबत लग्नाची बोलणी सुरू झाली.
महिलेला ही बाब समजली त्यानंतर तिने ‘ मी तुझ्यासाठी नवऱ्याला सोडलेले आहे तू तुला दुसरीकडे लग्न करून देणार नाही तू माझ्यासोबत लग्न कर मी लग्न करीन तर तुझ्यासोबत करीन आणि तुझ्या सोबतच राहील ‘ असा तगादा तिने देवेंद्रकुमार कडे सुरू केलेला होता त्यामुळे आरोपीने तिचा खून करण्याच्या उद्देशाने तिला पुण्यात बोलावून घेतले आणि दुचाकीवरून खराबवाडी येथील डोंगरावर नेले आणि स्टोन क्रशर मधील खदानित तिला ढकलून दिले त्यात तिचा मृत्यू झाला. महाळुंगे पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.