एक तारखेला एक वाजता बलात्कार , आरोपी शिक्षक अन मुलगी अल्पवयीन

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळ जनक असा प्रकार पुण्यातील पुरंदर तालुक्यातील निरा परिसरात समोर आलेला होता एका कोचिंग क्लास मधील अल्पवयीन मुलीला नापास करण्याची भीती दाखवत तिचा विनयभंग करून तिचा बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केलेली आहे . त्याच्या विरोधात जेजुरी पोलिसात फिर्यादी मुलीने तक्रार दाखल केली होती. 

उपलब्ध माहितीनुसार , सुनील विश्वनाथ चव्हाण ( वय 28 वर्ष मूळ राहणार सातारा सध्या राहणार निरा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून वार्ड क्रमांक एक मध्ये तो राहतो . शिकवण्याचे काम तो करत असून त्याच्या क्लासमध्ये पीडित अल्पवयीन मुलगी ही शिक्षणासाठी जात होती. 

एक तारखेला दुपारी एक वाजल्यानंतर आणि त्यानंतर आठ दिवसांनी कोचिंग क्लासेसच्या आतील रूममध्ये पीडित मुलगी अल्पवयीन आहे याची माहिती असताना त्याने तिला नापास करण्याची भीती दाखवत तिचा विनयभंग करत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सदर प्रकरणी मुलीने पोलिसात जेजुरी पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर आरोपीला गजाआड करण्यात आले. 


Spread the love