‘ ज्या ‘ झाडावर शरद मोहोळला मारण्याचा सराव केला आज रोजी ते झाड .. 

Spread the love

पुणे शहरात गाजलेल्या शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून गँगस्टर शरद मोहोळ याचा खून करणाऱ्या आरोपींनी गोळीबाराचा सराव ज्या झाडावर केलेला होता ते झाड आता गायब झालेले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट टीमचे पोलीस हवालदार शरद बबन वाकसे यांनी पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली असून साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर , नामदेव महिपती कानगुडे (वय 34 दोघेही राहणार सुतारदरा कोथरूड ) , आदित्य विजय गोळे ( राहणार पिरंगुट ) नितीन आनंदा खैरे ( राहणार कोथरूड ) आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

संतोष पोळेकर याने ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात हाडशी इथे रात्री एकच्या सुमारास गोळीबाराचा सराव केलेला होता असे सांगितले होते . झाडाच्या बुंध्यावर आम्ही सहा गोळ्या मारल्या असे त्याने सांगितले म्हणून पंचनामा करण्यासाठी पोलीस तिथे गेले मात्र त्यावेळी हे झाड तिथे अस्तित्वात नसल्याचे समोर आलेले आहे . जागा मालक यांनी ते झाड दहा महिन्यांपूर्वीच काढून टाकले असे सांगितलेले आहे. पुणे पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.


Spread the love