एकीकडे राम मंदिराची चर्चा देशभरात सुरू असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील पंचवटी इथे मंदिराच्या आमिषाने तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे . पंचवटी येथील प्रसिद्ध गोरेराम मंदिर यांचे प्रमुख असलेले महंत राजारामदास महाराज यांना 40 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिन्ही आरोपीत एका महिलेचा समावेश असून आरोपींनी महाराज यांची कार देखील पळून नेलेली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , राजू अण्णा चौगुले , रोहन राजू चौगुले ( दोघेही राहणार चौगुले निवास अशोक नगर सातपूर ) अशी फसवणूक करणाऱ्या दोन्ही संशयितांची नावे असून यामध्ये मंदिर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा देखील समावेश आहे. 2019 मध्ये या महिलेने महंत राजारामदास महाराज यांची विमा पॉलिसी काढलेली आहे . 2020 मध्ये गोरेराम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यावेळी संशयित महिलेने सोबत असलेल्या राजू याची महाराजांसोबत संगणमत करून ओळख करून दिलेली होती.
मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी आम्ही मदत करू असे आमिष या तिघांनी महाराजांना दाखवले आणि त्यानंतर सुरुवातीला महाराजांकडून आर्थिक अडचण आहे असे सांगत 12 लाख रुपये घेतले . काही दिवसात त्यांनी ते परत देखील केले मात्र अशाच पद्धतीने वेळोवेळी महाराजांसोबत त्यांनी व्यवहार केले आणि चाळीस लाख रुपये घेतले सोबत महाराजांची चार चाकी गाडी देखील घेतली ती पुन्हा परतच केली नाही.
अनेक दिवस उलटून गेले मात्र संशय यांनी रक्कमही प्रत केली नाही आणि बनावट कारणामा करून महंत राजारामदास महाराज यांची खोटी स्वाक्षरी देखील केली. तिन्ही संशयित यांनी 40 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केला . पंचवटी पोलीस ठाण्यात महंत राजारामदास महाराज यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.